डॉ. भाग्यश्री, स्नेहल, तनिष्का वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा उपक्रम...

डॉ. भाग्यश्री, स्नेहल, तनिष्का वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

सेलू : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा ८२ वा वर्धापनदिन व दलितमित्र श्रीरामजी भांगडीया स्मृतीदिनानिमित्त आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे बक्षिस वितरण आणि संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कोविड - १९ चे नियम पाळून शुक्रवार ( दि.०२ ) रोजी नूतन विद्यालयाच्या कै. रा.ब.गिल्डा सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम. लोया हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे , जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक संजय मगर यांची उपस्थिती होती.

मंचावर संस्थेचे सचिव डी. के. देशपांडे , सहसचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर , जयप्रकाश बिहाणी , शालेय समितीचे अध्यक्ष सिताराजी मंत्री , कार्यकारिणी सदस्य दत्तरावजी पावडे , प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी , मुख्याध्यापक संगीता खराबे यांची उपस्थिती होती. जिल्हास्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यातील साठ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून कवी यशवंत मकरंद , डॉ. भालचंद्र धर्मापुरीकर यांनी काम केले. या स्पर्धेसाठी पुस्तके, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोपटे असे बक्षिसाचे स्वरूप होते. तिन्ही गटातील पहिल्या क्रमांकाचे बक्षिस स्मृतीशेष कै. रमाबाई गणपतराव पाठक यांच्या स्मरणार्थ डॉ. अशोक पाठक , दुसरे बक्षीस स्मृतीशेष कै. सुशिलाबाई जनार्दनराव कान्हेकर यांच्या स्मरणार्थ प्रा. नागेश कान्हेकर , तिसरे बक्षिस स्मृतीशेष कै. शिलाबाई रंगराव कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ प्रा. महेश कुलकर्णी , उत्तेजनार्थ बक्षीस कै . मंजुश्री अनिरुद्ध पिंपळगावकर यांच्या स्मरणार्थ प्रा . गोपाळ पिंपळगावकर व कै. प्रविण सोनी यांच्या स्मरणार्थ प्रा . सुषमा सोमानी यांच्याकडून देण्यात आले. प्रस्तूत वक्तृत्व स्पर्धेचे समन्वयक सुरेश हिवाळे यांनी निकाल जाहीर केला. गट निहाय निकाल असा , पाचवी ते आठवी या गटात तनिष्का तेलभरे - प्रथम ( प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू ), समृद्धी मुळी - द्वितीय , उन्नती भोसिकर - तृतीय ( नूतन कन्या प्रशाला सेलू ), उत्तेजनार्थ कु. क्षितीजा खजिने ( प्रिन्स अॅकडली , सेलू ), आर्या पांडव , ( नूतन विद्यालय, सेलू ), नववी ते बारावी या गटात स्नेहल घोडके - प्रथम ( नूतन विद्यालय, सेलू ), भाग्यश्री मोहीते - द्वितीय ( जय जवान जय किसान महाविद्यालय कावलगाव ) , पल्लवी शिंदे - तृतीय ( नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालय , सेलू ), उत्तेजनार्थ श्रावणी वाघ ( नृसिंह विद्यालय, पोखर्णी ), स्नेहा आंधळे ( शांताबाई नखाते आश्रम शाळा, वालूर ) , तर शिक्षक व प्राध्यापक या गटात डॉ. भाग्यश्री धामणगावकर - प्रथम , प्रणिता सोलापुरे - द्वितीय , प्रा. किर्ती डोईफोडे - तृतीय , उत्तेजनार्थ डॉ. काशिनाथ पल्लेवाड , विरेश कडगे. या कार्यक्रमात शिष्यवृत्ती व राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील शिष्यवृत्ती धारक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव डी.के.देशपांडे यांनी केले. सुत्रसंचलन अतुल पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक नारायण सोळंके यांनी केले. मुख्याध्यापक रामकिशन मखमले , पर्यवेक्षक किरण देशपांडे , देवीदास सोन्नेकर अनिल रत्नपारखी , भालचंद्र गांजापुरकर , प्रा. हनुमान व्हरगुळे , स्वप्नीता ढवळे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.