डॉ.राहूल पवार यांना विमा सुरक्षा कवच योजनेचा लाभ देण्यात यावा- बच्चू कडू

राज्यमंत्री बच्चू कडू यांची मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांकडे मागणी...

डॉ.राहूल पवार यांना विमा सुरक्षा कवच योजनेचा लाभ देण्यात यावा- बच्चू कडू

परभणी : जिल्हयाचे भूमीपुत्र व पाथरी येथील अनंद नगर तांडा वस्तीवरील रहिवाशी डॉ.राहूल विश्वनाथ पवार हे अत्यंत गरीब कुटुंबातील उसतोड कामगाराचा मुलगा होता ते सध्या लातूर येथील एम.आय.टी महाविद्यालयात एम.बी.बी.एस. शिक्षण घेत होते. महाराष्ट्र युनिव्हर्ससिटी ऑफ हेल्थ सायन्स या युनिव्हर्ससिटीची एम बी.बी.एस. ची अंतिम वर्षांची परीक्षा गतवर्षी एप्रिल महिन्यात पार पडली. या वर्षी १६ से २३ मार्च दरम्यान प्रयेक्षिक परीक्षा झाली. या परीक्षा दरम्यान डॉ. राहुल पावर यांना कोविड संक्रमण झाले. दि. १ मे रोजी त्यांना माजलगाव येथे भरती करण्यात आले परंतू त्यांची तब्येत खालावल्यामुळे व संक्रमण वाढल्याने दि.१० मे रोजी त्यांना औरंगाबाद येथील एम.जी.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या उपचाराचा खर्च मोठा असल्याने व आई-वडील अत्यंत गरीब उसतोड कामगार असल्यामुळे त्यांना कर्ज काढून मुलांचा उपचार करावा लागला. उपचारादरम्यान दि.२६ मे रोजी औरंगाबाद येथील एम.जी.एम. वैद्यकीय महाविद्यालयात डॉ.राहूल पवार यांचे कोविड संक्रमण वाढल्यामुळे त्यांचे दुर्दैवी निधन झाले.

हातावर पोट असणाऱ्या गरीब कुटुंबातील उसतोड कामगार असलेल्या पवार कुटूबियांबर दुःखाचा डोंगर कोसळला असुन मुलाच्या शिक्षणासाठी पोटाला चिमटा काढून वेळ प्रसंगी उपाशी राहून उसनवारी करून मुलाला वैद्यकीय शिक्षण देऊन डॉक्टर करण्याचा प्रयत्न या कुटूबियांनी केला. अगोदरच गरीबी व त्यातुन मुलाच्या उपचारासाठी काढलेले भरमसाठ कर्ज आता कसे फेडायचे हा मोठा प्रश्न पवार कुटुंबीयासमोर उभा आहे. कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती विचारात घेता डॉ. राहुल पवार यांना विमा सुरक्षा कवच अंतर्गत विम्याची रक्कम मिळावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, गजानन चोपडे, युवराज राठोड, पिंटू कदम, सरपंच संगीता पवार, उपसरपंच अनिल राठोड, शाखा प्रमुख अनिल राठोड यांनी अमरावती येथे जाऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून डॉ.राहुल पवार कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली होती. त्याची तत्काळ दाखल घेत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी १० जून २०२१ रोजी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांची भेट घेऊन त्यांना पत्र देऊन फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करत असलेल्या डॉ. राहुल पवार यांना विमा सुरक्षा कवच अंतर्गत विम्याची रक्कम मिळावी अशी विनंती केली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.