डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना मरणोपरांत 'भारतरत्न' जाहीर करा.

1 min read

डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना मरणोपरांत 'भारतरत्न' जाहीर करा.

देव, देश आणि धर्मासाठी आपलं शतायुषी आयुष्य अक्षरशः खर्ची करणारे महात्मा, राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जीवनकार्य समस्त मानवजातीसाठी दिशादर्शक आहे.

देव, देश आणि धर्मासाठी आपलं शतायुषी आयुष्य अक्षरशः खर्ची करणारे महात्मा,
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जीवनकार्य समस्त मानवजातीसाठी दिशादर्शक आहे. अप्पांच्या कार्याचा सन्मान म्हणून मरणोपरांत 'भारतरत्न' जाहीर करावे, अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींकडे करणार आहोत, अशी माहिती माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली.

आमदार निलंगेकर यांनी आज 'भक्तीस्थळ', अहमदपूर येथे जाऊन राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवचार्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते बोलत होते.

आदरणीय शिवलिंग शिवाचार्य उर्फ अप्पा हे तीन पिढ्यांचे मार्गदर्शक राहिले आहेत. आणि त्यांचे विचारधन पुढील अनेक पिढ्याना मार्गदर्शक ठरणार आहेत. आचार, विचार आणि मुख्य म्हणजे आहार यातून त्यांनी एक विलक्षण सुंदर जीवन पद्धती जगाला सांगितली आहे. अप्पाची कारकीर्द वादळी आणि प्रेरणादायी आहे. अप्पांच्या कार्याबद्दल भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी आमदार संभाजीराव पाटील यांनी केली.