ड्रग्स कनेक्शन एनसीबीचा मोर्चा बॉलिवूड कडून टिव्ही कलाकारांकडे.

1 min read

ड्रग्स कनेक्शन एनसीबीचा मोर्चा बॉलिवूड कडून टिव्ही कलाकारांकडे.

ड्रग्स कनेक्शन टिव्ही स्टार अबिगेल पांडे आणि सनम जोहर यांच्याविरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई: बॉलिवूड मधील ड्रग्स कनेक्शन सोबतच आता छोट्य़ा परडद्यावरील कलाकार देखील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा राडारावर आहेत. बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन उघड करता-करता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा तपास टीव्ही कलाकारांपर्यंत पोहोचला आहे. त्याच पार्श्वभूमीवर टिव्ही स्टार अबिगेल पांडे आणि सनम जोहर यांच्याविरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अबिगेल पांडे आणि सनम जोहर यांची चौकशी केली जात असताना. 23 सप्टेंबरला पहिल्यांदा दोघांना एनसीबीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्या दिवशी दोघांकडून दिलेल्या माहितीच्या आधारे 24 सप्टेंबरला एनसीबीकडून मुंबईमध्ये तीन ठिकाणी रेड टाकण्यात आल्या. सुरुवातीला जेव्हा अबिगेल पांडे आणि सनम जोहर यांच्या घराची एनसीबीकडून झडती घेण्यात आली, त्यावेळेस त्यांना तिथे गांजा सापडला. अबिगेल पांडे आणि सनम जोहर या दोघांकडून टिव्ही इंडस्ट्रीमधील अजून काही मोठी नाव ड्रग्स प्रकरणात समोर आली.