ड्रग्स कनेक्शन ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट उत्तम पुरावा असू शकत नाही’-वकील उज्ज्वल निकम

1 min read

ड्रग्स कनेक्शन ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट उत्तम पुरावा असू शकत नाही’-वकील उज्ज्वल निकम

व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या माध्यमातून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बॉलिवूड मधील मोठ्या कलाकरांचे ड्रग्स कनेक्शन उघड केले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने या बड्या अभिनेत्रींना समन्स बजावले आहेत. याच पार्श्र्वभूमीवर उज्जवल निकम यांनी हे मत व्यक्त केले आहे.

मुंबई : ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट उत्तम पुरावा असू शकत नाही’ असे भाष्य सरकारी वकील उज्जवल निकम यांनी केले आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या माध्यमातून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बॉलिवूड मधील मोठ्या कलाकरांचे ड्रग्स कनेक्शन उघड केले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने या बड्या अभिनेत्रींना समन्स बजावले आहेत. याच पार्श्र्वभूमीवर उज्जवल निकम यांनी हे मत व्यक्त केले आहे.
व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या आधारे अभिनेत्री दीपिका पदुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह यासारख्या बड्या अभिनेत्रींना एनसीबीकडून समन्स बजावण्यात आले आहेत. त्यांचे चॅटिंग किंवा मेसेज एनसीबीच्या हाती लागले आहेत. त्या आधारे या अभिनेत्री ड्रग्स प्रकरणात अडकू शकतात का? हा पुरावा म्हणून कोर्टात ग्राह्य धरला जाऊ शकेल का? असे प्रश्न विचारला जात आहे.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले की, ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग किंवा मेसेजस’ हा उत्तम पुरावा होऊ शकत नाही. यासाठी एनसीबीला आणखी पुरावे शोधावे लागतील. परंतू अनेक ड्रग्स पुरवणाऱ्यांनी याबाबत माहिती दिली असल्याचे समोर आले असल्याने व्हॉट्सअ‍ॅप चॅट आणि मेसेज हे महत्त्वाचे पुरावे ठरु शकतात. या अभिनेत्रींना एनसीबीने समन्स दिला आहे कारण या प्रकरणाबाबत त्यांना अधिक पुरावे जमा करुन या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाता येईल. आणखी तपास सुरु असल्यामुळे त्यांना शिक्षा होईल की नाही, असे सांगता येणार नाही.