पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

निलंगा तालूक्यातील फक्त तीस टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण

पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

विजय देशमुख/निटूरः निलंगा तालूक्यात पावसा अभावी पेरण्या खोळंबल्या असून केवळ तीस टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अद्यापही पेरणी योग्य मोठा पाऊस पडला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे आहे लागले. गेल्या वर्षी च्या तुलनेमध्ये यावर्षी पावसाळा चांगला होईल व सरासरी पेक्षा पाऊस चांगला पडेल असा अंदाज हवामान खात्याने सांगितला होता, त्यामुळे शेतकरी आनंदी होता. मात्र मृग नक्षत्र संपून आता आर्द्रा नक्षत्र सुरू होवून चार दिवस झाले अद्यापही पावसाचा पत्ता नसल्यामुळे शेतकरी हवालदील झाल्याचे दिसते आहे. निलंगा तालूक्यामध्ये नव्वद हजार हेक्टरवर खरीपाचा पेरा होणार आहे. तर केवळ सोयाबीन हे सत्तर हजार हेक्टरवर पेरले जाणार आहे. त्यामुळे अद्याप पाऊस पडत नसल्याने शेतकरी पेरणीपूर्व मशागत करून बसला आहे.

तालूक्यातील कांही गावामध्ये मृग चांगला बरसल्यामुळे शेतकऱ्याने सोयाबीन सह तुरीचा पेरा केला आहे. मात्र त्याही पिकाला पंधरा दिवसापासून पाऊस नसल्याने शेतकऱ्यापुढे दुबार पेरणीचे संकट उभा राहीले आहे. तालूक्यातील शेतकऱ्यांना आजही सोयाबीन च्या पिशव्यासाठी वणवण करावी लागत असून अनेक दुकानदार सोयाबीन पिशव्यांची टंचाई असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी ना इलाज म्हणून चढ्या भावाने बियाणे खरेदी करत आहेत.

दरम्यान गेल्या वर्षी पर्जन्यमान जेमतेम झाल्याने सोयाबीन उत्पादनाला मोठा फटका बसला होता त्यामुळे यावर्षी तरी चांगले पर्जन्यमान होवून चांगले उत्पादन होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.