दुरडी ग्रामपंचायत सहा सदस्यांची बिनविरोध निवड

परभणी जिल्ह्यातील दुरडी ग्रामपंचायत निवडणुकीत सात पैकी सहा सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत

दुरडी ग्रामपंचायत सहा सदस्यांची बिनविरोध निवड

विजय कुलकर्णी /परभणी : तालुक्यातील मौजे दुरडी येथील ग्रामस्थांनी  एकत्रित येऊन सात पैकी सहा  ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड केली आहे. परभणी विधानसभेचे आ. डाॕ. राहुल पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन दुरडी येथील सर्व ग्रामस्थांनी ही बिनविरोध निवड केली आहे.


मंगळवार ५ जानेवारी रोजी आमदार संपर्क कार्यालयात  नवनिर्वाचित बिनविरोध सदस्यांचा सत्कार आ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवाजीराव चोपडे, संजय चोपडे, भास्कर चोपडे, नवनाथ गायकवाड, रंगनाथ चोपडे, माजी सरपंच नारायण वावळे आदी उपस्थित होते. सोबतच नवनिर्वाचित सदस्य लक्ष्मीबाई आश्रोबा आळसे, शेषराव वामनराव आळसे, राजुबाई बापुराव चोपडे, शोभाबाई बाबाराव चोपडे, नेत्रा बळीराम खोडवे, आशामती मुंजाजी चोपडे आदींचीही उपस्थिती होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.