दसरा; विजयादशमीचे महत्त्व व मान्यता

दसरा; विजयादशमीचे महत्त्व व मान्यता

अश्विन शुक्ल दशमी म्हणजेच विजयादशमी. आज (१५ ऑक्टोबर) दिवशी भारताच्या विविध प्रांतामध्ये विजयादशमी आणि दसऱ्याचा सण साजरा केला जात आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या आजच्या दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन, सीम्मोलंघन करण्याची प्रथा आहे.

वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचे प्रतीक म्हणून दसरा साजरा केला जातो. दुर्गा देवीने महिषासुराचा वध करून असुरांवर विजय मिळवला. म्हणून या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. याच विजयादशमीच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी लंकापती रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवला, असे सांगितले जाते. अश्विन शुद्ध दशमीला दसरा साजरा केला जातो. नवरात्राची सांगताही याच तिथीला दुर्गा विसर्जनाने केली जाते. या दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले, अशीही आख्यायिका आढळून येते. आपल्याकडे विजयादशमीच्या सणाला फार महत्त्वाचे स्थान आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.