महाआवास अभियान अंतर्गत ई-ग्रहप्रवेश संपन्न

तालुक्यातील घरकुल पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या घराची चावी देऊन गृहप्रवेशाचा कार्यक्रम

महाआवास अभियान अंतर्गत ई-ग्रहप्रवेश संपन्न

सोनपेठ : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना हक्काचे घर असावे ही संकल्पना सुरू करुन पूर्णत्वास आलेल्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लागल्याने या अभियाना अंतर्गत दिनांक १५ जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या घरांचा मुंबईत ई.गृहप्रवेश संपन्न झाला.

तालुकास्तरावर सभापती सौ.आशा अरविंद बदाले यांचे अध्यक्षतेखाली व गटविकास अधिकारी सचिन भगवान खुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील घरकुल पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या घराची चावी देऊन गृहप्रवेशाचा कार्यक्रम सोनपेठच्या पंचायत समिती सभागृहात पार पडला.दिनांक १९ ऑक्टोबर २०२० रोजी सुरू करण्यात आलेल्या या महाआवास अभियान(ग्रामीण)अंतर्गत तालुक्यातील घरे विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आलेली असून ऐन पावसाळ्यात या लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळाल्याने लाभार्थ्यांनी या अभियानाप्रती समाधान व्यक्त केले.सदरच्या ई-गृहप्रवेश कार्यक्रमाचे प्रास्तविक आनंद गंगावणे यांनी केले.तर गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी उपस्थितांना महाआवास अभियानाचे उद्दिष्ट सांगून लाभार्थी यांनी विक्रमी वेळेत घरकुल पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन करुन स्वागत केले.सभापती बदाले यांनी लाभार्थ्यांना त्यांच्या घराची चावी दिली.

याप्रसंगी अरविंद बदाले,कृषी अधिकारी कदम,सहायक लेखाअधिकारी श्रीमती अंबेकर,विस्तारअधिकारी अविनाश माळी,पंडित,धुमाळ,ग्रामीण गृहअभियंते आनंद गंगावणे,यांच्यासह पंचायत समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.