खा. भावना गवळी प्रकरणी पाथरीतही ईडीचा छापा

खा. भावना गवळी प्रकरणी पाथरीतही ईडीचा छापा

परभणी : शिवसेना खासदार भावना गवळी यांच्याविरुध्द ईडीने आज सकाळपासून सुरु केलेल्या कारवाईत त्यांच्या फर्मसंबंधीत एका पार्टनरच्या पाथरी येथील निवासस्थानी ईडीच्या पथकाने दुपारी १२ च्या सुमारास छापा टाकून चौकशीची कारवाई सुरु केली आहे.

पाथरी येथील एकता नगर भागातील एका निवासस्थानी ईडीचे एक मोठे पथक सीआरपीएफच्या तुकडी व स्थानिक पोलिसांच्या मदतीने दाखल झाले. या पथकाने लगेचच चौकशीची कारवाई सुरु केली. यासंदर्भात ईडीच्या किंवा स्थानिक पोलिस प्रशासनाने कमालीची गुप्तता बाळगली होती. ईडीचे पथक सायंकाळी उशीरापर्यंत कारवाईत दंग होते. दरम्यान, या प्रकाराने पाथरी शहरासह परभणी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.