खा. सुप्रिया सुळे यांनी सोनिया गांधीची भेट

विरोधकांनी सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर आरोप केले आहेत. असे असताना काँग्रेसची नेमकी भूमिका काय?

खा. सुप्रिया सुळे यांनी सोनिया गांधीची भेट

नवी दिल्ली : परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनवर केलेल्या आरोपा मुळे महाविकास आघाडी सरकार अनेक आरोप होत आहे. दिल्लीतही महाराष्ट्रातील घडामोडींचे पडसाद उमटले आहे. या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. ही माहीती सुप्रिया सुळे ट्टिट करून दिली.

महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस एक घटक पक्ष आहे. विरोधकांनी सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर आरोप केले आहेत. असे असताना काँग्रेसची नेमकी भूमिका काय? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात होता. महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या सर्व नेत्यांची बैठक घेतली. ज्यात एका गटाचे म्हणणे होते की आपण मित्र पक्षाबरोबर उभे राहिले पाहिजे, त्यांना सहकार्य केले पाहिजे. पण एका गटाचे म्हणणे होते की या आरोपांमुळे काँग्रेसचे नुकसान होत आहे. असे मतभेद असताना सुप्रिया सुळे आणि सोनिया गांधी यांच्यात झालेली चर्चा महत्वाची ठरते.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्वीटमध्ये सोनिया गांधी यांनी मार्गदर्शन केले याबाबत आभारही व्यक्त केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणावर या दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचे चित्र आहे. राज्यातील राजकीय घडामोडींनंतर तिन्ही पक्षांनी आता एकत्र येऊन आक्रमक भूमिका घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे तिन्ही पक्ष एकत्र आहेत त्यांच्यात मतभेद नाही हेच यातून स्पष्ट होत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.