आर्थिक सकंट: कोरोना काळात राज्याचा बेरोजगारी दर 20.9% वर

राज्य सरकारने अनलॉक करण्याचा निर्णय घेऊनही स्थानिक पातळीवर काही ठिकाणी प्रशासनाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा राज्यातील अर्थव्यवस्थेपुढे बेरोजगारीचे मोठे संकट.

आर्थिक सकंट: कोरोना काळात राज्याचा बेरोजगारी दर 20.9% वर

मुंबई : कोरोना काळात महाराष्ट्रात सतत लावल्या गेलेल्या लॉकडाऊन मुळे राज्याला मोठ्या आर्थिक फटका बसला आहे. राज्याची आर्थिक स्थिती आतिशय बिकट होत आहे. इतकच नाहीतर राज्यातील बेरोजगारी दर 20.9% झाला आहे. पुनःश्च हरिओम नंतर राज्यातील बेरोजगारीचा  दर जुलै महिन्यात 3.9% पर्यंत घसरला आहे. राज्य सरकारने अनलॉक करण्याचा निर्णय घेऊनही स्थानिक पातळीवर काही ठिकाणी प्रशासनाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस बेरोजगारी दर 6.9% पर्यंत पुन्हा वाढला आहे.

कोरोना काळात लॉकडाऊन नंतर एप्रिल महिन्यात बेरोजगारी दर 5.8 टक्क्यांवरून थेट 20.9 टक्क्यांपर्यंत गेला. त्यानंतर मे मध्ये हा दर सुधारुन 15.5% पर्यंत गेला.   राज्यात पुनःश्च     हरीओम सुरू झाल्यानंतर  जूनमध्ये हा दर 9.2% तर जुलैमध्ये 3.9 % पर्यंत गेला. पण तरीही काही ठिकाणी लॉकडाऊन गेल्यामुळे ऑगस्टमध्ये हा दर 6.2% पर्यंत वाढला. त्यामुळे एकूणच अनलॉक आणि लॉकडाऊनच्या भूमिकेबाबत सातत्य न ठेवल्याने हे चित्र झाले आहे.  त्यामुळे राज्यातील अर्थव्यवस्थेपुढे बेरोजगारीचे मोठे संकट उभे आहे.

राज्यातील आर्थिक परिस्थिती नेमकी काय आहे? याबाबत अर्थखात्याने नुकताच मुख्यमंत्री, आणि राज्यातील महत्वाच्या मंत्र्यांसमोर सादरीकरण केले. यामध्ये राज्यातील अर्थव्यवस्था, महसुलातील नुकसानापासून अनेक बाबींवर चर्चा झाली. यात राज्याचा जीएसटी परतावा कमी आल्यामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक संकटात भर पडली असल्याचे देखील म्हटले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.