एक असे बेट जीथे फक्त महिलांनाच  प्रवेश

1 min read

एक असे बेट जीथे फक्त महिलांनाच प्रवेश

बेटावर महिलांना तंदुरुस्ती, पौष्टिकता आणि त्यांच्या दैनंदिन धावपळीच्या आयुष्यात त्यांना मिळत नसलेल्या सर्व गोष्टी मिळतील.

तुम्ही अशा ठिकाणाबद्दल ऐकले आहे का जिथे फक्त महिलाच जाऊ शकतात? आज तुम्हाला अशा एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत जीथे पुरुषांना मनाई आहे. आणि तीथे फक्त महिलांना प्रवेश मिळतो.

फिनलँडच्या बाल्टिक समुद्राजवळ सुपर्शी बेट असे या जागेचे नाव आहे. या वर्षी हे बेट उघडले जाईल. ८.४७ एकर क्षेत्रात पसरलेले हे बेट अमेरिकन व्यावसायिका क्रिस्टीना रॉथ यांनी विकत घेतले आहे.

त्याचे झाले असे की, क्रिस्टीना रॉथ एका अशा जागेच्या शोधात होत्या जीथे फक्त महिलाच आपली सुट्टी आरामात घालवू शकतील. त्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागू नये. त्यांचे म्हणणे आहे की, या बेटावर महिलांना तंदुरुस्ती, पौष्टिकता आणि त्यांच्या दैनंदिन धावपळीच्या आयुष्यात त्यांना मिळत नसलेल्या सर्व गोष्टी मिळतील.

सुपरशी आयलँडमध्ये एक रिसॉर्ट आहे, ज्याचे निर्मितीचे काम अजून सुरू आहे. या रिसॉर्टमध्ये ४ केबिन असतील आणि या केबिनमध्ये आरामात १० महिला बसू शकतील. रिसॉर्टमध्ये स्पा, बाथटबसह इतर अनेक सुविधा उपलब्ध असतील. एवढेच नाही तर सर्व केबिन आरोग्यावर पूर्ण भर देऊन तयार केली जात आहेत. यामध्ये केबिनची किंमत दोन लाख ते चार लाख रुपयांपर्यंत असेल, ज्यामध्ये महिला पाच दिवस आपला वेळ आरामात घालवू शकतात.

अहवालानुसार महिलांना या बेटावर जाण्यासाठी तिकिट बुकिंग करण्यापूर्वी ते मंजूर करावे लागेल. इतकेच नाही तर त्यांच्या मंजुरीसाठी प्रथम स्काइपद्वारे मुलाखत द्यावी लागेल. एका वृत्तानुसार क्रिस्टीना रॉथ म्हणाल्या की, मला पुरुषांबद्दल द्वेष नाही. पुढे जावून हे बेट पुरुषांसाठी देखील उघडू शकते, परंतु याक्षणी हे केवळ महिलांसाठी उघडले गेले आहे.