भाजपला मोठा धक्का एकनाथ खडसेंचा राजीनामा...राष्ट्रवादीत प्रवेश

1 min read

भाजपला मोठा धक्का एकनाथ खडसेंचा राजीनामा...राष्ट्रवादीत प्रवेश

"एकनाथ खडसे यांच्यासह आणखी काही जण राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक -जयंत पाटील

भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला . शुक्रवारी (23 ऑक्टोबर) ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती स्वत: त्यांनी दिली आहे. मात्र एकनाथ खडसे यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
"एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सोडला असल्याची माहिती मला मिळाली आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील." यावेळी "एकनाथ खडसे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय झाला," असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
"एकनाथ खडसे यांनी आज सकाळी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत घेण्यात कोणतीही अडचण नाही," असंही जयंत पाटील म्हणाले. "राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येताना खडसे यांनी कोणतीही अट ठेवली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्त्वात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली," असंही पाटील यांनी नमूद केलं.