रेमिडीसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा तात्काळ दूर करा

भाजप अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. सुधाकर भालेराव, प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. गोविंद केंद्रे व आदीेचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रेमिडीसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा तात्काळ दूर करा

उदगीर: सध्या कोरोनाच्या पेशंटची संख्या खूप वाढत असून त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा या अपुऱ्या पडत आहेत. कोरोना पेशंटची संख्या वाढली असून त्यांना मिळणारा ऑक्सिजन, तसेच रेमेडीसीवर इंजेक्शन यांचा खूप मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. राज्य शासनाने लवकरात लवकर ऑक्सीजन सिलेंडर व रेमिडीसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा वाढवावा, लसीकरणाची संख्याही वाढवावी याकरीता उदगीर भारतीय जनता पार्टी तर्फे उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.

covid-19 बाधित रुग्णांना अत्यावश्यक सेवा पुरवून रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेल्या रेमेडीसिव्हिर इंजेक्शन सुद्धा उपलब्ध नसल्यामुळे काळाबाजार होत आहे. या रुग्णांची हेळसांड करून रुग्ण दगावत आहेत. इंजेक्शन साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे व छोट्या व्यावसायिकांना दुकाने चालू करण्यासाठी किमान सकाळी दहा ते पाच पर्यंत दुकाने चालू ठेवण्यास परवानगी देण्यात यावी.

जनतेवर लॉकडाउनचे जे निर्बंध लादण्यात आलेेले आहेत. तो अतिशय चुकीेचे असून प्रामुख्याने नाभिक समाजाचे दुकाने उघडी ठेवण्यामध्ये त्यांना परवानगी देण्यात यावी, तसेच आरोग्यविषयक सेवांकडे विशेष लक्ष देऊन नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी साहाय्य करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. सुधाकर भालेराव, प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. गोविंद केंद्रे जेष्ठ नेते धर्मपाल नादरगे, सरचिटणीस रामचंद्र तिरुके, शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर, तालुका अध्यक्ष बसवराज रोडगे, जिल्हा अध्यक्ष आ ज बालाजी गवारे, पंडित सूर्यवंशी, महिला प्रदेश सदस्य उत्तरा कलबुगे, शिवाजी भाळे सर,सरचिटणीस श्यामल कारामुगे, महिला अध्यक्ष मधुमती कनशेट्ये, नगरसेवक गणेश गायकवाड, ऍड दत्ता पाटील, रुपेंद्र चोहान सरचिटणीस आनंद साबणे, राजकुमार मुक्कावार, ऍड. सावन पस्तापुरे, आनंद बुंदे,युवा मोर्चा अध्यक्ष अमोल निडवदे, ऍड प्रकाश तोंडारे, मुक्रम जहागिरदार, ऍड. भाऊसाहेब जांभळे, अमित बोळीगावे, संतोष बडगे, रवींद्र बेद्रे, दयानंद उडबळे, दिनेश देशमुख, विरलाल कांबळे, संजय पांढरे,दीपक शिंदे, अनिता बिरादार, उषाताई माने, शिवकर्ण आधारे, अरुणा बेलकोने, जयश्री टिळेकर, महादेवी पाटील, रंजना बोडगे, बबीता पांढरे उपस्थित होते


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.