सर्वच आमदारांचे निलंबन केले तरी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत राहणार- फडणवीस

१२ निलंबीत आमदार राज्यपालांच्या भेटीला...

सर्वच आमदारांचे निलंबन केले तरी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत राहणार- फडणवीस

मुंबईः विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात गोंधळ झाला असून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी तालिका अध्यक्षांनाही धक्काबुक्की झाल्याचा आरोप सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्यात बैठक झाली. यात भाजपच्या १२ आमदारांना निलंबीत करण्यात आले. या निलंबनाच्या कारवाईनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर टीका केली आहे.

ओबीसीच्या मुद्यावर आम्ही सरकारला उघडे पाडले. त्यामुळे खोटे आरोप लावून आमदारांना निलंबित केले. १२ नव्हे १०६ आमदारांचे निलंबन केले तरी चालेल पण ओबीसी मुद्यावर बोलत राहू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भास्कर जाधव काय बोलले ते सांगणार नाही. सर्व शांत झालेले असताना ही मॅन्यूफॅक्चर्ड कारवाई केलीय, असे विरोधी पक्षनेते देवेॆद्र फडणवीस म्हणाले.

विधानसभेत जोरदार राडा, १२ आमदारांचे निलंबन
विरोधी पक्षाचा कामकाजावर बहिष्कार...

नेहमीच अध्यक्षांचा चेंबरमध्ये बाचाबाची होते, तरीही आतापर्यंत निलंबन झाले नाही. यावेळी कुणीही शिवी दिली नाही. शिवी देणारे कोण होते हे सर्वांना माहिती आहे, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, आशिष शेलारांनी माफी मागूनही कारवाई केली गेली. निलंबनासाठी स्टोरी तयार केली गेली झात आहे. राज्य सरकारला प्रथम मागासवर्ग आयोग स्थापन करावा लागेल असे जस्टीस भोसले, खंबाटांनी मराठा आरक्षणासंदर्भात सांगितले आहे. त्यामुळे असे ठराव करून उपयोगाचे नाही. सरकार वेळकाढू धोरण काढतंय दोन्ही प्रस्ताव हे दोन्ही समाजाची दिशाभूल करणारे आहेत. असे फडणवीस यांनी म्हटले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.