औरंगाबाद मध्ये आता पुण्या-मुंबईसारख्या इमारती.

1 min read

औरंगाबाद मध्ये आता पुण्या-मुंबईसारख्या इमारती.

औरंगाबादमध्ये १५ मजली गगनचुंबी इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा; महापालिका आणि क्रेडाईच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

सुमित दंडुके/औरंगाबाद: यापूर्वी औरंगाबादमध्ये केवळ ११ मजल्याच्या इमारती उभारण्यास परवानगी होती. प्रशासनाच्या निर्णयामुळे आता औरंगाबाद जिल्ह्यात गगनचुंबी इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकतीच यासंदर्भात औरंगाबाद महानगरपालिका आणि क्रेडाईच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली. यावेळी औरंगाबादमध्ये १५ मजली इमारती बांधण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता औरंगाबादमध्ये बांधकाम क्षेत्रासाठी प्रगतीची नवी दारं खुली झाल्याचे बोलले जात आहे.

लवकरच औरंगाबादमध्ये २२ मजली इमारती बांधण्यासही परवानगी मिळू शकते. त्यामुळे आता मुंबई-पुण्यासारख्या शहरांप्रमाणे औरंगाबादेतही गगनचुंबी इमारती उभारल्या जातील. महापालिका आणि क्रेडाईच्या अधिकाऱ्यांमध्ये यासंदर्भात बैठक झाली होती. यावेळी बांधकाम उद्योगासंबंधी अनेक महत्त्वाच्या मुद्दयांवर चर्चा झाली. त्यामुळे भविष्यात औरंगाबादमध्ये बांधकाम उद्योग क्षेत्राला चालना मिळण्याची शक्यता आहे.

यापूर्वी औरंगाबादमध्ये केवळ ११ मजल्याच्या इमारती उभारण्यास परवानगी होती. त्यासाठीही बऱ्याच अटी-शर्तींचे पालन करावे लागत होते. त्यामुळे बांधकाम उद्योजकांना मर्यादित संधी उपलब्ध होत्या. या पार्श्वभूमीवर गगनचुंबी इमारतींसाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.या समितीकडून करण्यात आलेल्या शिफारसीअंती १५ मजल्याच्या इमारती उभारण्यास परवानगी देण्यात आली