सराईत मोबाईल चोरास अटक

आरोपीकडून ३ महागडे मोबाईल जप्त, अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

सराईत मोबाईल चोरास अटक

सुमित दंडुके / औरंगाबाद : शहरात विविध ठिकाणी नागरिकांना भेटून, नातेवाईकांना कॉल करण्यासाठी मोबाईल द्या, असे म्हणत मोबाईल घेऊन पळून जाणाऱ्या सराईत आरोपीला जिन्सी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्ता शेळके आणि सहकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.

२९ डिसेंबर आणि ११ जानेवारी रोजी जिन्सी पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे दोन गुन्हे दाखल होते. तेव्हापासुन पोलीस या आरोपीचा शोध घेत होते. विशेष म्हणजे दाखल झालेल्या दोन्ही गुन्ह्यात एकाच प्रकारे मोबाईल चोरी होती. 'नातेवाईकांना कॉल करायचा आहे मोबाईल द्या' असे म्हणून मोबाईल घेऊन हा आरोपी पळून जायचा. पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून सदरील आरोपीची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने हे मोबाईल चोरले असल्याची कबुली पोलीसांना दिली.

या आरोपीकडून ५० हजार रु किंमतीचे ३ मोबाईल जप्त करण्यात आले. शेख उस्मान शेख मोहम्मद (वय.३०, रा.शरीफ कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने याची अधिक चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सदरील कामगिरी जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्यंकट केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ता शेळके, हेमंत सुपेकर, संपत राठोड, हारुण शेख, किशोर बुंदीले, नंदलाल चव्हाण, संजय गावंडे, संतोष बमनात यांनी यशस्वी पार पाडली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.