बाहुबली फेम प्रभासच्या नव्या सिनेमाचं धमाकेदार पोस्टर रिलीज

1 min read

बाहुबली फेम प्रभासच्या नव्या सिनेमाचं धमाकेदार पोस्टर रिलीज

तानाजी फेम ओम राऊतच दिग्दर्शन

मनस्विनी साबळे- ‘आदिपुरुष’ प्रभासच्या या नव्या सिनेमाची घोषणा मंगळवारी सकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी झाली. प्रभासने एक व्हिडिओ शेअर करत या सिनेमाच्या घोषणेबाबत हिंट दिली होती.

बाहुबली फेम प्रभासने त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. ‘आदिपुरुष’ असं त्याच्या नव्या चित्रपटाचं नाव असून. या सिनेमाच दिग्दर्शन तानाजी फेम ओम राऊत यांनी केलं आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला तसेच अजय देवगनची मुख्य भूमिका असलेला तानाजी चित्रपट गाजला व सर्वाधिक लोकप्रिय देखील ठरला होता. प्रभासने इंस्टाग्रामवर या सिनेमाचं पोस्टर शेअर केलंय. हा सिनेमा एक थ्रीडी ऍक्शन असेल तसेच, सिनेमा हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषेत रिलिज होईल. २०२२ मध्ये हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे. आता या चित्रपटाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागल्याचं दिसून येत आहे.