शिवभोजन थाळीला मुदतवाढ

शिवभोजन थाळीची मुदत १४ जुलै २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

शिवभोजन थाळीला मुदतवाढ

मुंबई : राज्यात ‘ब्रेक द चेन’ या प्रक्रियेअंर्तगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब व गरजू जनतेसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते त्यामध्ये राज्यातील गरीब जनतेला शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत एक महिन्यासाठी मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. १५ एप्रिल २०२१ पासून सुरु असलेली ही सुविधा आता १४ जुलै २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन पाठवलेल्या नि:शुल्क थाळीच्या मुदतवाढीच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत १५ एप्रिल ते १७ जून या काळात ९० लाख ८१ हजार ५८७ मोफत थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत ४ कोटी ७० लाख १८ हजार १८४ थाळ्यांचे वितरण झाले आहे.

राज्यात शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत ४४१ नवीन केंद्रांना मंजूरी देण्यात आली असून यामुळे प्रतिदिन थाळ्यांची संख्या ४४,३०० ने वाढली आहे. राज्यात आतापर्यंत १३३२ शिवभोजन केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. नव्याने मंजूर केलेल्या ४४१ केंद्रापैकी काही केंद्रे सुरु झाली असून काही केंद्रे अल्पावधीतच सुरु होतील. आजघडीला राज्यात एकूण १०४३ शिवभोजन केंद्रे सुरु आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.