आयपीएल बघायचं चाहत्याने केली सोनू सूदला टी.व्ही. देण्याची मागणी...

1 min read

आयपीएल बघायचं चाहत्याने केली सोनू सूदला टी.व्ही. देण्याची मागणी...

सोनू सूदच्या चाहत्यांच्या अपेक्षा खुपच वाढल्याचे दिसत आहे. सोनु सूदच्या एका चाहत्याने ट्वीटरवर ट्वीट करून चक्क आईपीएल बघण्यासाठी टी.व्ही देण्याची मागणी केली आहे.

कोरोनामुळे संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आलं होत. अनेक लोक, कामगार आपआपल्या गावी जाण्यासाठी निघाले पण जायचं कसं? कोणतेच साधन नाही ना पैसे नाहीत. बरेच लोक तर पायी चालत गावाकडे निघाले, वाटेत जेवण तर नाहीच पण प्यायला पाणी सुध्दा मिळत नव्हतं. अशा वेळी यांच्या मदतीला धावून आला. बॉलीवुडचा हा विलेन खऱ्या अर्थाने हिरो सोनू सूद. त्याने अनेक लोक, कामगार यांना आपआपल्या गावी जाण्यासाठी. त्याने स्वतःचे लाखो रूपये खर्च करून जितकं शक्य होईल त्या सगळ्यांची जेवणाची, गावी जाण्याची व्यवस्था करून दिली होती. लोकांना रेल्वे,बसची व्यवस्था तर केलीच पण उत्तराखंडातील देहरादून येथील १७० कामगार मुंबईत अडकले होते. या कामगारांना त्यांच्या घरी जाण्यासाठी, सोनूनं या १७० कामगारांसाठी स्वत: खर्च करून चार्टर्ड विमानाची सोय केली. स्थलांतरीत मजुरांसाठी केलेल्या कामामुळं 'रिअल' लाइफमध्येही हिरो ठरलेल्या अभिनेता सोनू सूद याचं सर्वच स्तरांतून कौतुकही झालं. मध्यंतरी सोशल मीडियावर एका गरीब शेतकऱ्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोनू सूदने लगेचच मदतीचं आश्वासन दिलं. शेतकरी आपल्या देशाचा गौरव आहे. त्या शेतक-याला ट्रॅक्टरही पाठवलं. सोनू सूदचं इतकं मोठं मन पाहून अनेकांनी त्याच्या या कामाचं कौतुक केलं आहे.

जे कोणत्या राजकारण्यांना जमलं नाही ते सोनून करून दाखवलं. अनेकांनी तर सोनू सूदला 'देवदूत' असल्याचेही म्हटले. मात्र आता सोनू सूदच्या चाहत्यांच्या अपेक्षा खुपच वाढल्याचे दिसत आहे. सोनु सूदच्या एका चाहत्याने ट्वीटरवर ट्वीट करून चक्क आईपीएल बघण्यासाठी टी.व्ही देण्याची मागणी केली आहे. आता यावर सोनु सूद काय प्रतिक्रिया देणार हे बघणे औत्सुक्याचे आहे.