शेतकऱ्याला पोलीसाकडून बेदम मारहाण

पैशाच्या मोहापायी पोलीस कर्मचाऱ्याने मारल्याचा शेतकऱ्याचा आरोप, पोलीस अधिक्षकांकडे केली तक्रार...

शेतकऱ्याला पोलीसाकडून बेदम मारहाण

लातुर : देवणी तालुक्यातील चवणहिप्परगा शिवारात शेतकऱ्याला जवळगा बीटचे पोलीस कर्मचारी यांनी बेदम मारहाण केली.(Farmer beaten to death by police) या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची चौकशी करून निलंबित करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्याने निवेदनाद्वारे मंगळवार दि.३० मार्च रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

चवणहिप्परगा येथील शेतकरी गंगाधर कोतवाड यांची सर्वे नंबर ८१ मध्ये शेतजमीन आहे. शेत शेजारच्या शेतक-यांत व कोतवाड यांच्यात आर्थिक देवाणघेवाण वरुन वाद सुरू आहे. या प्रकरणी शेजारच्या शेतकऱ्याची एकतर्फी बाजू मांडण्यासाठी पैशाच्या मोहापायी पोलीस कर्मचारी रमेश कांबळे यांनी दि.२६ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे माझ्या शेतात येऊन मला काठीने बेदम मारहाण केली. मला मारु नका असे मी व तेथे उपस्थित लोकांनी सांगितले मात्र त्यांनी कोणाचेही ऐकले नाही. माझ्यावर झालेला अन्याय मला सहन करणे कठीण झाले. या प्रकरणी मी मंगळवार दि.३० मार्च रोजी देवणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली मात्र तेथील संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी माझी तक्रार घेतली नाही. अशा आशयाचे निवेदन लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा यांच्याकडे दिले आहे.

विकलेल्या शेतात ट्रॅक्टर चालू देत नव्हता
चवणहिप्परगा येथील गंगाधर कोतवाड या शेतकऱ्याने शेजारच्या शेतकऱ्याला शेती विकली आहे. विकलेल्या शेतीत त्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर चालवू देत नव्हता, त्याला बाजूला हो म्हंटले तर दारुच्या नशेत मलाच शिविगाळ केली. असे पोलीस कर्मचारी रमेश कांबळे यांनी सांगितले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.