शेतकऱ्यांनी विश्वास दाखवून ऊस द्यावा.

1 min read

शेतकऱ्यांनी विश्वास दाखवून ऊस द्यावा.

शेतकऱ्यांनी आपल्या हक्काचा कारखाना असणाऱ्या, योगेश्वरी शुगर साखर कारखान्यास ऊस गाळपास देण्याचे आवाहन योगेश्वरी शुगरचे मॅनेजिंग डायरेक्टर ॲड.रोहीत आर.देशमुख यांनी केले आहे.

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र म्हणून आपल्या कारखान्याची ओळख निर्माण झाली आहे. आजपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या विश्वासास पात्र म्हणून या कारखान्यानी ओळख निर्माण केली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या हक्काचा कारखाना असणाऱ्या, या योगेश्वरी शुगर साखर कारखान्यास ऊस गाळपास देण्याचे आवाहन योगेश्वरी शुगरचे मॅनेजिंग डायरेक्टर ॲड.रोहीत आर.देशमुख यांनी केले आहे. यावर्षी ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने ३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्टास शेतकऱ्यांनी प्रतिसाद देऊन सर्वाधिक ऊस गाळप करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही देशमुख यांनी यावेळी केले.
WhatsApp-Image-2020-10-10-at-6.06.27-PM
योगेश्वरी शुगर साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२०-२१ साठी आयोजित १९ व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमास ते बोलत होते. यावेळी जेष्ठ संचालक माजी आमदार आर.टी.देशमुख श्री यज्ञेश्वर रंगनाथ महाराज सेलूकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ संचालक एम.टी.देशमुख, राहुल देशमुख, डॉ.अभिजीत देशमुख, बबन देशमुख, मनोज देशमुख, तुषार देशमुख, सचिन देशमुख कारखान्याचे प्रमोटर, लक्ष्मीकांत घोडे, इंदरराव कदम, सुदामराव सपाटे यांच्यासह ऊसउत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार, ठेकेदार कर्मचारी, कामगार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.