शेतक-यांनी घरगुती बियाणे वापरा, कृषी विभागाची जनजागृती

1 min read

शेतक-यांनी घरगुती बियाणे वापरा, कृषी विभागाची जनजागृती

बीजोउत्पादन प्रक्रिया राबवण्यासाठी कृषी विभागाची जनजागृती मोहीम.

सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी: मागील वर्षी शेतकऱ्यांवर प्रमाणित केलेले बियाणे उगवले नसल्याने आर्थिक भार सहन करून दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्याचबरोबर काही कृषी केंद्रांवर गुन्हे ही दाखल झालेली आहेत. यामुळे येणाऱ्या खरीप हंगामात देखील शेतकऱ्यांना सोयाबीन या बियाण्यांचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने. सोनपेठ तालुका कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषीअधिकारी गणेश कोरेवाड, सहाय्यक तालुका कृषीअधिकारी समीर वाळके यांच्या प्रयत्नातून गावपातळीवर घरगुती बियाणे वापरून बीबीएफ यंत्राचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांना पुढील वर्षासाठी यावर्षी सोयाबीन काढणी हंगामामध्ये पडलेल्या पावसाने त्रास सहन करावा लागला आहे. या सर्व शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीच्या सोयाबीनचा प्लॉट निवडून यातून भेसळयुक्त असणारी सोयाबीनची झाडे काढत दर्जेदार बीजोउत्पादन करण्यासाठी काढणी हंगामापूर्वी आठदिवस अगोदर बाविस्टिन किंवा बुरशीनाशक अशा औषधीची फवारणी करून सदर बियाणे जतन करून ठेवण्यासाठी आवाहन केले जात आहे.
गावपातळीवर एका ग्रामस्तरीय समितीची रचनाही करण्यात आली आहे. या समितीने जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना घरगुती बियाणे वापरण्याचे आवाहन करत. यासाठी त्यांना प्रोत्साहित करायचे आहे. त्याचबरोबर या समितीत तीन प्रगतशील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असून. त्यांच्या ज्ञानाचा फायदाही मार्गदर्शक म्हणून इतर शेतकऱ्यांना होणार असल्याचे कळते. यासाठी कालिदास मस्के, सुनील औताडे यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अनुक्रमे ५ व ३ एकरवर पेरण्यात आलेल्या सोयाबीन पिकाचा प्रात्यक्षिक म्हणून वापर करण्यात येऊन. या वाणाची विक्री शेतकऱ्यांना बियाणे म्हणून करण्यात येणार आहे.