केंद्र सरकारच्या अध्यादेशांचे शेतकऱ्यांकडून स्वागत.

1 min read

केंद्र सरकारच्या अध्यादेशांचे शेतकऱ्यांकडून स्वागत.

हे तीन अध्यादेश शेती व शेतकऱ्यांसाठी फायद्याचे असल्याने केंद्र सरकारच्या या धाडसी अध्यादेशाचे शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: केंद्र सरकारने शेती संबधाने काढलेल्या तीन अध्यादेशांचे शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. हे अध्यादेश कायद्यात रुपांतरीत करण्याची मागणी ही करण्यात आली आहे.
देशातील शेतकऱ्यांना बाजाराचे स्वातंत्र्य मिळावे, तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे, यासाठी शेतकरी संघटना गेली चाळीस वर्ष लढा देत आहे.या लढाईतील प्रमुख मागण्यांपैकी एक शेतकऱ्यांना बाजाराचे स्वातंत्र्य असावे. शेतकऱ्यांना आपला माल कोणत्याही बाजारात विकता यावा. ही मागणी केंद्र सरकारने एक बाजार एक देश ही घोषणा करत शेतमालाचा बाजार सामान्य नागरीकांसाठी एका अध्यादेशा द्वारे खुला केला आहे. यामुळे शेतकरी आपला माल आता थेट विकू शकणार आहे. तसेच दुसऱ्या एका अध्यादेशामुळे शेतीमाल आवश्यक वस्तु कायद्याच्या बाहेर काढल्यामुळे सरकार आता शेतीमालाच्या किमंती नियंत्रीत ठेवणार नाही. तसेच करार शेतीच्या अध्यादेशामुळे शेतीत गुंतवणूक वाढणार असल्याने थेट शेतीला फायदा होणार आहे .

हे तीन अध्यादेश शेती व शेतकऱ्यांसाठी फायद्याचे असल्याने केंद्र सरकारच्या या धाडसी अध्यादेशाचे शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. या संबधाने शेतकरी संघटनेच्या वतीने तहसिलदार डॉ आशिषकुमार बिरादार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शेतकरी संघटनेचे युवा तालुका अध्यक्ष सोमनाथ नागुरे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.