शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार -अजित पवार

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्पा कृषीक्षेत्राने चांगली प्रगती केली असून राज्य सरकारने जाहीर केले.

शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार -अजित पवार

मुंबईः महाविकास आघाडी सरकारकडून आज विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली आहे. यात कोरोना काळातही राज्यातील कृषी क्षेत्राने चांगली प्रगती केली असून राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषीमाफीचा फायदा हा शेतकऱ्यांना झाला असल्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितले. कोरोना काळात सर्व क्षेत्रात मंदी असताना राज्यातील कृषी क्षेत्राने चांगली प्रगती केली. या काळात राज्यातील कृषी आणि सलग्न क्षेत्रात ११.७ टक्के इतकी भरघोस वाढ पहायला मिळाली. त्यामुळे शेती आणि शेतकरी यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितले.

अहिल्याबाई होळकरांच्या नावावर तालुकास्तरावर रोपवाटीका केंद्रांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. राज्यात एकूण २६ सिंचन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

१२ धरणाच्या बळकटीसाठी ६२४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोसीखुर्द प्रकल्पासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पनाच्या विक्रीसाठी सुरु करण्यात आलेल्या 'विकेल ते पिकेल' या योजनेसाठी २ हजार १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

तीन लाखांपर्यंत मर्यादीत कर्ज घेणाऱ्या आणि त्याची परतफेड वेळेत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना झाला असून ३१ लाख २३ हजार शेतककऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

एपीएमसीच्या बळकटीसाठी २ हजार कोटी रुपये देण्याचे जाहीर केले असून पशुसंवर्धन आणि मत्स्य योजनेसाठी ३७०० कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.अमरावतीच्या मोर्शीमध्ये संत्रा प्रकल्पाची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

कोरोना काळात सर्व क्षेत्रात मंदी असताना राज्यातील कृषी क्षेत्राने चांगली प्रगती केली. या काळात राज्यातील कृषी आणि सलग्न क्षेत्रात ११.७ टक्के इतकी भरघोस वाढ पहायला मिळाली. त्यामुळे शेती आणि शेतकरी यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.