पन्नास गावांचा विजेचा प्रश्न मिटला

आ. डॉ. राहुल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

पन्नास गावांचा विजेचा प्रश्न मिटला

विजय कुलकर्णी / परभणी : तालुक्यातील ५० गावांचा विजेचा प्रश्न मिटला असून वीज वितरण कंपनीच्या वतीने वीज पुरवठा सुरळीत होणार आहे़. त्यामुळे रब्बी हंगामासाठी मुबलक वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या आ.डॉ.राहुल पाटील यांच्या मागणीला यश आले आहे़.

परभणी येथील १३२ केव्ही उपकेंद्रातून उपलब्ध असलेल्या एकमेव विद्युत वाहिनीवरून जवळपास ५० गावांना वीज पुरवठा करण्यात येत होता. त्यात ७ उपकेंद्रे तसेच परभणी महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा विद्युत पुरवठा एकाच लाईनवरून करण्यात येत होता. त्यामुळे शेतीला पाणी देताना वीज पुरवठा सातत्याने खंडित होत होता. शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. विद्युतपुरवठा करणाऱ्या फिडरची विभागणी करण्याची मागणी धर्मापुरी, टाकळी कुंभकर्ण, झरी, टाकळी या भागातील शेतकऱ्यांच्या वतीने सातत्याने करण्यात येत होती. याप्रश्नी परभणीचे आ.डाॕ.राहुल पाटील यांनी विशेष लक्ष घालून वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता प्रविण अन्नछत्रे, कार्यकारी अभियंता राजेश लोंढे, उपकार्यकारी अभियंता कैलास जमदाडे तथा ग्रामीणचे उपकार्यकारी अभियंता नरेंद्र मानकर, सहायक अभियंता नितनवरे आदींसोबत बैठक घेवून हा महत्वाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत सुचना केल्या होत्या. तसेच वीज वितरण कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला. आता धर्मापुरी, टाकळी कुंभकर्ण, झरी, टाकळी बोबडे अशी स्वतंत्र फिडर योजना वीज वितरण कंपनीने कार्यान्वित केली आहे़. त्यामुळे संबंधीत ५० गावांचा वीज पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे़.
शेतकऱ्यांची अनेक दिवसांची मागणी मान्य झाल्यामुळे आज सोमवार दि. ४ जानेवारी रोजी डाॕ.राहुल पाटील यांचा शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सहसंपर्क प्रमुख डाॕ. विवेक नावंदर, उपजिल्हा प्रमुख सदाशिवराव देशमुख, तालुका प्रमुख नंदु पाटील अवचार, तुकाराम मुळे मामा, सुंदरराव देशमुख, बबनराव सामाले, खाजा काजी, बालासाहेब कदम, प्रसादराव आरमळ, अच्युतराव सामाले, एकनाथराव देशमुख, गंगाधरराव मोरे, भास्करराव देवडे, गोपाळ सामाले, गजाननराव देशमुख उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रल्हाद देवडे तर आभार किशोर देशमुख यांनी मानले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.