मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा, भाजप आमदारांची थेट पोलिसात तक्रार

अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेत, समता नगर पोलिसात केली तक्रार दाखल केली

मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा, भाजप आमदारांची थेट पोलिसात तक्रार

मुंबई : साकीनाका निर्भया प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाला हात घातला असून महिलांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात बाहेरून कोण येतो, कोठून येतो, कोठे जातो याची नोंद ठेवा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिेले आहेत. यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळतर यांनी आक्षेप घेत, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध कांदिवलीतील समता नगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत भातखळतर यांनी ट्वीट करत म्हटंल की, ‘मंत्रिमंडळात आपल्या मांडीला मांडी लावून बसणारे धनंजय मुंडे, आपल्या पक्षाचे नेते संजय राठोड हे परप्रांतीय आहेत का? असा माझा मुख्यमंत्र्याना सवाल आहे. सामाजिक तेढ पसरवल्याबद्दल मी आज मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.’ अशी माहिती त्यांनी दिली आहे.

तसेच परप्रांतीयांच्या नोंदी ठेवणे हे पूर्णपणे चुकीचे असून याबाबत मी मुख्यमंत्र्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांच्या दोन समाजगटांमध्ये तेढ आणि विद्वेष निर्माण करण्यावरून मी कलम १५३ अ अंतर्गत तक्रार करण्याची आवश्यकता असून येत्या काही दिवसांत आपण अशी तक्रार करणार असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.