कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - रुपाली चाकणकर

कंगना राणावतचा पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने काढून घ्यावा.

कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - रुपाली चाकणकर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच तिच्या बेधडक व्यक्तव्यांसाठी सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकतेच पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेत्री कंगना रणौत तिच्या आणखी एका वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले, १९४७ मध्ये तर भीक दिली असं विधान कंगनाने केलं. तिने केलेल्या या विधानावरून सोशल मीडियावर टिका होत आहे. यावर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देशाची एकता, अखंडता आणि अस्मिता यामध्ये फूट पाडणाऱ्या कंगना राणावतचा पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने काढून घ्यावा आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून आपण अशा देशद्रोह्यांना पाठीशी घालत नाही हे केंद्र सरकारने सिद्ध करावे.देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आणि आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या प्रत्येकाचा हा अपमान आहे. ज्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या नावे सिनेमा बनवला, पैसे कमावले त्या खाल्ल्या मिठाला तरी जागायचे होते. असे ट्वीट चाकणकर यांनी केले आहे.

दरम्यान कंगना सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल बोलताना म्हणाली, त्यांना हे माहित होतं की रक्तपात झाला तरी हिंदुस्तानी हा हिंदुस्तानीवर वार करणार नाही. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत मोजली हे खरं. पण ते स्वातंत्र्य नव्हतं, भीख होती. खरं स्वातंत्र्य तर २०१४ मध्ये मिळालं असं कंगना म्हणाली. कंगनाच्या उत्तरावर निवेदिका नाविका कुमार म्हणाल्या, म्हणूनच सगळे तुला म्हणतात की तू भगवा आहेस. त्यावर कंगना म्हणते, आता या विधानानंतर माझ्यावर आणखी १० केसेस होणार आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.