सोयाबीन लंपास करणार्‍या ट्रकचालकाविरूध्द गुन्हा दाखल

या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय..

सोयाबीन लंपास करणार्‍या ट्रकचालकाविरूध्द गुन्हा दाखल

परभणी: तालुक्यातील पेडगाव येथून दहा लाख ६१ हजार रुपये किंमतीचे सोयाबीनचे पोते लंपास करणाऱ्या ट्रकचालकाविरूध्द ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.

बालाजी ट्रेडिंग कंपनीचे मालक गोविंद अजमेरा यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री फिर्याद दिली. त्यात बालाजी ट्रेडिंग कंपनी येथून आठ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता ट्रक (क्र. एम.एच. ४२ बी ७४८५) मध्ये ४६७ कट्टे सोयाबीन भरले होते. सोलापूर येथे ते पोचवायचे होते. ट्रक चालक विष्णू रघू सुर्वे याने तो माल सोलापूर येथे पोहचती केलाच नाही. सायंकाळी येथून निघालेला ट्रक गुरुवार दि.११ रोजी सकाळी दहापर्यंत सोलापूरला पोचला नाही. शिवाय, ट्रकचालकाशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे ट्रकचालकाने आपली फसवणूक केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ते सोयाबीन सुमारे दहा लाख ६१ हजार २७० रुपये किंमतीचे होते. ट्रकचालकासह मालकाने संगनमत करून मालाचा अपहार करत आपली फसवणूक केली असल्याचेही अजमेरा यांनी म्हटले आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक गणेश राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार भगवान जाधव हे करीत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.