अखेर औरंगाबाद पूर्णत: अनलॉक !

शहर अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात तर ग्रामीण तिसऱ्या टप्प्यात होणार अनलॉक...

अखेर औरंगाबाद पूर्णत: अनलॉक !

सुमित दंडुके/औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे काही महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन लावण्यात आले होते. आता ही रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. राज्यात ५ टप्प्यात अनलॉक प्रक्रिया होणार आहे. यात पहिल्या टप्प्यात औरंगाबाद शहराचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या नियमानुसार जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन आपत्ती व्यवस्थापन समितीने निर्णय घ्यावा असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, मनपा प्रशासक अस्तिक पांडेय यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली यात शहर संपूर्ण अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर ग्रामीण भागात दुपारी चार वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांसह इतर सेवा सुरू राहतील तर सायंकाळी ५ वाजेनंतर ग्रामीण भागात संचारबंदी कायम राहणार आहे.

औरंगाबाद शहराचा पॉझिटिव्हीटी रेट २.२४ टक्के असुन ऑक्सिजन बेडवर उपचार घेणारे रुग्ण हे २२.१९ टक्के इतके आहे. त्यामुळे शहर अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात असुन सोमवार दि.७ जून सकाळी ७ वाजेपासुन शहरातील सर्व निर्बंध काढून टाकण्यात आले आहे. मात्र शासनाने घालून दिेेलेल्या त्रिसुत्री नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.(मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंन्सिंग).

सर्व दुकाने, गार्डन, सलून, ब्युटी पार्लर, थिएटर्स, मॉल्स, रेस्टॉरंट, हॉटेल, नाट्यगृह, जीम, क्रीडा मैदाने, मनोरंजनाची ठिकाणे, खाजगी व शासकीय कार्यालयं पूर्ण सुरु ठेवता येणार आहे. तसेच लग्न समारंभ आणि अंत्यविधीला कोणतेही निर्बंध असणार नाही.

औरंगाबाद ग्रामीणसाठी वेगळे नियम
वाढत्या पॉझिटिव्हीटी रेटनुसार औरंगाबाद ग्रामीणचा समावेश हा तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व दुकाने सकाळी ७ ते ४ पर्यंतच सुरु असतील. सलून, ब्युटी पार्लर, थिएटर्स, मॉल्स, रेस्टॉरंट, हॉटेल, नाट्यगृह, मनोरंजनाची ठिकाणे, खाजगी व शासकीय कार्यालयं हे ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. तसेच सायंकाळी ५ नंतर संचारबंदी असेल.

हे ठिकाणं असतील बंदच
पर्यटनस्थळे, धार्मिकस्थळे, शाळा, महाविद्यालय हे मात्र पुढील आदेश येईपर्यंत बंदच असेल.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.