अखेर करुणा शर्मा यांना जमीन मंजूर

चार्जशीट दाखल होईपर्यंत न येण्याच्या सूचना

अखेर करुणा शर्मा यांना जमीन मंजूर

बीड : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांच्यावर कथित आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांना आज अखेर जमीन मंजूर करण्यात आला आहे. करुणा शर्मा यांनी अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायलयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने करुणा शर्मा यांना २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

अंबाजोगाई आणि परळीमध्ये चार्जशीट दाखल होईपर्यंत न येण्याच्या त्यांना सूचना आहेत. अॅट्रोसिटी प्रकरणात करुणा शर्मा यांना ५ सप्टेंबरला अटक करण्यात आली होती. जवळपास १६ दिवसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली आहे. शर्मांसह त्यांचे चालक अजय मोरेंनाही जामीन मिळाला आहे.

काय आहे प्रकरण?
करुणा शर्मा यांना ५ सप्टेंबरला अटक झाली होती. करुणा शर्मांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर एका महिलेला जातिवाचक शिवीगाळ करत प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली करुणा शर्मा आणि त्यांचा सहकारी अरुण मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. परळी पोलिसांनी त्यांना ५ सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर ६ सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.