अखेर त्या १२ आमदारांची यादी सापडली

सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, त्यामुळे आता ही यादी तुम्हाला देऊ शकत नाही

अखेर त्या १२ आमदारांची यादी सापडली

मुंबई : ठाकरे सरकराने शिफारस केलेल्या १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडेच असल्याचं समोर आलं आहे. राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलेल्या अपिलावरील सुनावणी झाली. राज्यपाल कार्यालयातील उपसचिव प्राची जांभेकर यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, त्यामुळे आता ही यादी तुम्हाला देऊ शकत नाही, मात्र ती राज्यपालांकडे सुरक्षित असल्याचं सांगितल आहे. तसेच निकाल आल्यानंतर राज्यपाल त्यावर निर्णय घेतील. आपल्या माहिती अंतर्गत मागवण्यात येत असलेल्या माहितीबाबत कायदेशीर सल्ला घेऊनच आपल्याला उत्तर दिले जाईल असे सांगण्यात आल्याचे गलगली यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकाने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावाची यादी ६ नोव्हेंबर २०२० रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. यादी सुपूर्द करुन ७ महिने उलटले तरीही राज्यपालांनी नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष निर्माण झाला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.