अखेर 'ते' फार्महाऊस सील, शहरालगतच्या सर्वच फार्महाऊसवर प्रशासनाची करडी नजर

आयोजकांवर गुन्हा दाखल, प्रशासन अलर्ट...

अखेर 'ते' फार्महाऊस सील, शहरालगतच्या सर्वच फार्महाऊसवर प्रशासनाची करडी नजर

सुमित दंडुके/औरंगाबाद : दोन दिवसांपुर्वी विकेंड लॉकडाऊन असतानाही खा.इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत शहरालगतच्या दौलताबाद येथील अंबर फार्महाऊसवर कव्वालीचा कार्यक्रम झाला होता. यात शेकडो लोकांची उपस्थिती होती. कोणीही मास्क लावलेले नव्हते, शासनाचे सर्व नियम मोडून हा कार्यक्रम झाला होता. यात खासदार जलील यांच्यावर पैशांची उधळण करण्यात आली होती. याचे व्हिडीओ व्हायरल होताच यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत होती.

त्यानंतर आता प्रशासनाने कारवाई करीत सदरील फार्महाऊस सील केले आहे. तर आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौलताबाद पोलीस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांच्या उपस्थितीत फार्म हाऊस सील करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे व तपासाअंती कार्यक्रमात सहभागी झालेल्यांवरही गुन्हा दाखल केला जाणार आहे.

गलती कर बैठे इम्तियाज जलील
विकेंड लॉकडाऊन असताना भान हरपून कव्वाल्लीत मग्न खासदार, नियमांची पायमल्ली, प्रशासन काय कारवाई करणार...

आता सर्वच फार्महाऊसवर जिल्हाधिकाऱ्यांची नजर
शहरालगत अनेक फार्महाऊस आहे. जेथे नेहमीच अशाप्रकारचे कार्यक्रम होत असतात. पण आता हे सर्वच फार्महाऊस प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. महसूल, पोलीस, आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकामार्फत सर्व फार्महाऊसवर करडी नजर ठेवणार असल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.

जलील यांच्यावर गुन्हा दाखल करा, चंद्रकांत खैरेंच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
इम्तियाज जलील यांचा कव्वालीच्या कार्यक्रमातील व्हिडीओ समोर आल्यानंतर औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिल आहे. खैरे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. इम्तियाज जलील यांनी कोरोना काळात अनेक वेळा नियम मोडले आहेत. त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी मागणी खैरे यांनी केली. या निवेदनावर माजी महापौर नंदकुमार घोडेले, राजेंद्र जंजाळ, बाळासाहेब थोरात यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मनसेचा प्रशासनाला इशारा
नियम केवळ सामान्य लोकांनाच लागू नाहीत तर इथल्या मंत्री, आमदार, खासदार अधिकारी वर्गाला देखील लागू आहेत. खासदार इम्तियाज जलील यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करा, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल, असा इशारा मनसेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी दिला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.