कुटुंबावर आर्थिक संकटः भाजीपाला 4 ते 5 पट महागला.

1 min read

कुटुंबावर आर्थिक संकटः भाजीपाला 4 ते 5 पट महागला.

कांदा, बटाटा, तेल, जिरे, पालेभाज्या, फळभाज्या, फळे या सर्वांची किंमत 4 ते 5 पटीने वाढ झाली आहे.

मुंबई : कोरोनाच्या काळात देशावर आर्थिक सकंट आले. आर्थिक संकटाची झळ आता गरीब कुटुंबियांना देखील बसत आहे. कांदा, बटाटा, तेल, जिरे, पालेभाज्या, फळभाज्या, फळे या सर्वांची किंमत 4 ते 5 पटीने वाढ झाली आहे. आणि त्यावर सरकारचे काहीही नियंत्रण नाहीये. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबियांना आता जगावे की मरावे असा प्रश्न पडलाय. सरकारने कितीही दावे केले की महागाई आटोक्यात आहे, तरी वास्तव मात्र वेगळंच आहे.

कोरोनामुळे रोजगार जाऊन आर्थिक चणचण वाढली आहे. तर दुसरीकडे वाढत्या महागाईला तोंड देताना सामान्यांचे हाल होत आहेत. डाळींच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने डाळींच्या किंमती वाढल्याचे कारण सांगितले जात आहे. तर तेलाचे देखील दर वाढले आहेत.

कोरोनाकाळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जास्तीतजास्त हिरव्या पालेभाज्या खाव्यात, असा सल्ला तज्ज्ञ देतात. मात्र, मार्केटमध्ये गेल्यावर भाज्यांचे भाव ऐकून अक्षरशः चक्कर येणं बाकी राहातं. अपवाद वगळता सर्वच भाज्या महागल्या आहेत. तुटपुंज्या बजेटमध्ये ताळमेळ बसविताना गृहिणींची मोठी कसरत होत आहे.