बँक बंद असल्याने आर्थिक व्यवहार ठप्प

संपात सर्वच बँका सहभागी...

बँक बंद असल्याने आर्थिक व्यवहार ठप्प

परभणी : बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने दोन दिवसीय संप पुकारला असून या संपात जिल्ह्यातील १०२ शाखेतील ४५० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. सोमवारी आणि मंगळवार, १६ मार्च या दोन दिवसाच्या संपाच्या कालावधीमध्ये बँकेच्या नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एटीएम सुविधा सुरळीत चालू राहणार आहेत.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने १५ आणि १६ मार्च रोजी दोन दिवसाचा देशव्यापी संप पुकारला आहे. खाजगीकरणाच्या विरोधात हि संप असून सोमवारी या संपास सुरवात झाली. यामुळे बँकांचे कामकाज विस्कळित झाले. शासनाच्या अविचारी व एककल्ली धोरणाचा विरोध करण्यासाठी हा संप पुकारल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. राष्ट्रीयकृत बँका ही आपली सर्वांची सामाईक संपत्ती आहे, ती टिकवून ठेवणे, व त्यात वृद्धी करणे ही सर्वांची सामुहीक जबाबदारी आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या खासकिकरणाच्या विरोधात हा देशव्यापी संप आहे. नफ्यात चाललेल्या, सर्वसामान्यांचा विश्वास असलेल्या बँका मूठभर भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाट सरकार करत आहे. देशातील गोर गरीब जनतेला बँकिग सुविधा रास्त दारात उपलब्ध व्हाव्यात म्हणुन खासगी बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि मागील ५० वर्षाच्या काळात सरकारी बँका या खेडोपाडी पोहचल्या. स्वतःला मॅनेजमेंट गुरू म्हणून घेणाऱ्या सरकारने बँकांतील काळानुरूप सुधारणा करणे योग्य पण सरसकट बँकाचे खासगीकरण करणे म्हणजे गोरगरीब, सर्वसामन्यांच्या हिताला नुकसान पोहचविणारे असल्याने याचा युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन निषेध करत असल्याचे भारतीय स्टेट बँकेचे विभागीय अध्यक्ष डॉ. सतीश टाके, सचिव सुनील हट्टेकर, आशिष देवधर, शिवराम खेदुळकर, कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव भास्कर विभुते, मंगेश टिकुळे यांनी म्हटले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.