कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी 'ब्रेक द चेन' मोहिमेचे पालन करा- शरद पवार

सगळ्या राजकीय नेत्यांना, प्रसारमाध्यमांना, सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या घटकांना माझी आग्रहाची विनंती आहे की परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नात आपले सहकार्य असू द्या. , शरद पवार

कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी 'ब्रेक द चेन' मोहिमेचे पालन करा- शरद पवार

मुंबईः राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रकोप झाला आहे. रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत चाली आहे. राज्यात सर्वत्र निर्बंध लावण्यात आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारच्या 'ब्रेक द चेन' या मोहिमेला सध्या राज्यभरातील विविध स्तरांतून विरोध होत आहे, पण याशिवाय संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी काही पर्याय नाही, ही बाब राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधून सांगितले.

शरद पवार काय म्हणाले

कोरोना रुग्णांची वाढती लोकसंख्या ही चिंताजनक बाब आहे. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, परिचारक, आरोग्य कर्मचारी अहोरात्र कष्ट घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारला काही कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत. केंद्र सरकारही या संबंधी आग्रही आहे.

कालच मी देशाच्या आरोग्य मंत्र्यांशी संपर्क साधला. ज्या काही कमतरता असतील त्यासंबंधी चर्चा केली. केंद्र सरकारचा आरोग्य विभाग पूर्ण ताकदीनिशी राज्यांच्या पाठीशी आहे. त्यांची मदत आणि आपल्या सगळ्यांचे सामूहिक प्रयत्न यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे.

शेतकरी, कामगार, नोकरदार, हमाल, व्यापारी, व्यावसायिक, कष्टकरी प्रत्येक घटकाला या संकटामुळे झळ बसली आहे. दुकानं व व्यापार-धंदे बंद असल्यामुळे नुकसान होत आहे. फळे-भाजीपाला या नाशिवंत मालाच्या विक्रीचा प्रश्न उभा राहिल्याने शेतकरी वर्गाचेही अपरिमित नुकसान झाले आहे.

या परिस्थितीला धैर्याने सामोरे गेले पाहिजे. समाजातल्या सर्व घटकांना विनंती की आपल्याला वास्तव नाकारून चालणार नाही. जनतेच्या जीविताच्या दृष्टीने काही अपरिहार्य निर्णय राज्य सरकारला घ्यावेच लागतात. हे निर्णय राबवण्यासाठी आपल्या सगळ्यांचे सहकार्य आवश्यक आहे.

सगळ्या राजकीय नेत्यांना, प्रसारमाध्यमांना, सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या घटकांना माझी आग्रहाची विनंती आहे की परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नात आपले सहकार्य असू द्या.

महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस, सर्व घटक अशा संकटाच्या काळात बाकीच्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून हिमतीने सामोरे जाण्यासाठी यंत्रणेला सहकार्य देतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. या सामुदायिक प्रयत्नांतून आपण कोरोनावर निश्चित मात करू आणि या संकटातून नागरिकांची सुटका करू. असे फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधून सांगितले.

वर्तमान परिस्थितीला धैर्याने सामोरे जावे लागेल. सर्व घटकांनी राज्य सरकारला सहकार्य करावे
#Live: ”कोरोना रुग्णांची वाढती लोकसंख्या ही चिंताजनक बाब आहे. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, परिचारक, आरोग्य कर्मचारी अहोरात्र कष्ट घेत परिस्थितीवर नियंत्रण...

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.