खगोल प्रेमीसांठी पर्वणी, 'ब्लू मून' दिसणार.

1 min read

खगोल प्रेमीसांठी पर्वणी, 'ब्लू मून' दिसणार.

यापूर्वी २०१८ साली दिसला होता 'ब्लू मून'.

मुंबई-महिन्यातून एकदा होणारे पूर्ण चंद्राचे दर्शन, चालू महिन्यात दोनदा होणार आहे. एकाच महिन्यात दोनदा पूर्ण चंद्र दिसल्यास त्यातील दुसऱ्या पूर्ण चंद्राला इंग्रजीत 'ब्लू मून' असे म्हटले जाते. येत्या ३१ ऑक्टोबरला रात्री ८.१९ वाजता हा 'ब्लू मून' दिसणार आहे. या महिन्यातील पहिले पूर्ण चंद्र दर्शन २ ऑक्टोबरला पहाटे २.३५ वाजता झाले होते.
एखाद्या दुर्मीळ प्रसंगाला इंग्रजीत 'वन्स इन अ ब्लू मून' असे संबोधित केले जाते. या संबोधनाचा वापर १७ व्या शतकात पहिल्यांदा झाला. सर्वसाधारणपणे प्रत्येक महिन्याला एक, याप्रमाणे दरवर्षी १२ पूर्ण चंद्र दिसतात. मात्र, 'ब्लू मून'च्या महिन्यात १३ पूर्ण चंद्र दिसतात.यापूर्वी २०१८ साली ३१ जानेवारी व ३१ मार्च या दोन दिवशी ब्लु मून दिसला होता.