बारावीच्या निकालासाठी, विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक जारी

उच्च माध्यमिक शाळांनी तसेच कनिष्ठ महाविद्यालय यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे बैठक क्रमांक अवगत करून दिले आहेत.

बारावीच्या निकालासाठी, विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक जारी

मुंबईः बारावीचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. निकाल काही दिवसात लागणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना निकाल पाहण्या साठी बैठक क्रमांक आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षा 2021 साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे बैठक क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

कोरोना मुळे बारावीच्या परिक्षा रद्द कण्यत आशल्या होत्या.त्यापूर्वी 2019 परीक्षेसाठी प्रवेश होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत 3 एप्रिल रोजी ऑनलाइन प्रवेश पत्र देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व उच्च माध्यमिक शाळांनी तसेच कनिष्ठ महाविद्यालय यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे बैठक क्रमांक अवगत करून दिले आहेत. काही विद्यार्थ्यांना त्यांची बैठक क्रमांक अवगत झाले नसल्यास अशा विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर सदरची माहिती उपलब्ध करून दिली आहे.

कसा पाहाल आपला बैठक क्रमांक
मंडळाच्या http://mh-hsc.ac.in/ या वेबसाईटवर जा
वेबसाईट ओपन झाल्यानंतर तिथे आवश्यक असलेली माहिती म्हणजे आपला जिल्हा, तालुका सिलेक्ट करा.
खालील टॅबमध्ये आधी आडनाव नंतर आपले नाव मग वडिलांचें नाव अशा स्वरुपात भराइंटर केल्यानंतर आपला रोल नंबर आपल्याला दिसेल.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.