ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटु डीन जोन्स यांचे निधन

1 min read

ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटु डीन जोन्स यांचे निधन

ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटु डीन जोन्स (वय ५९) यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र धक्कयाने निधन झाले.

ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटु डीन जोन्स (वय ५९) यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र धक्कयाने निधन झाले. जोन्स सध्या दुबईत खेळल्या जात असलेल्या  आयपीएल २०/२० सामन्यांचे मुंबईतून धावते समालोचन करत होते.

डीन जोन्स यांना सर्वकालिक महान क्रिकेटपटु म्हणून ओळखल्या जाते. ५२ कसोटी आणि १६४ एकदिवसीय सामने खेळलेल्या जोन्स यांनी ऑस्ट्रेलियन संघात एक भरवंशाचा खेळाडू अशी ओळख निर्माण केली. ५२ कसोटी सामन्यात त्यांनी ४६.५५ च्या सरासरीने ११ शतकांच्या मदतीने ३६३१ व १६४ एकदिवसीय सामन्यात ७ शतक फटकावत ४४.६१ च्या सरासरीने ६०६८ धावा केल्या.

१९८४ मध्ये विंडीज दौऱ्यावर ग्रैहम योप जखमी झाल्याने त्याच्याऐवजी जोन्सला पदार्पणाची संधी मिळाली आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. १९८७ मध्ये पहिल्यान्दा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघात जोन्स यांचा समावेश होता. डेविड बून व जेफ मार्श यांच्यासह जोन्स ऑस्ट्रेलियन  संघातला सर्वाधिक भरवंशाचा फलदांज होता.