माजी मुख्यमंत्र्यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा; तृणमूलमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

माजी मुख्यमंत्र्यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा; तृणमूलमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

पणजी: आगामी गोवा विधानसभा निवडणुकांपुर्वीचं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काॅग्रेसेचे माजी मुख्यमंत्री लुईजिन्हो फलेरो यांनी पक्षातून आपला राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लुईझिन्हो फलेरो हे लवकरच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फालेरो यांनी यापूर्वी नुकतंच ममतांचं कौतुक देखीलं केलं होतं. आता राजीनाम्यानंतर आपल्या समर्थकांना संबोधित करताना फालेरो म्हणाले की, “मी काँग्रेसमध्ये त्रस्त होतो. मला गोव्याचा हा त्रास संपवायचा आहे. जर माझं दुःख इतकं असेल कॉंग्रेससाठी मतदान करणाऱ्या गोव्यातील नागरिकांच्या दुर्दशेची कल्पना करा.”

“गोव्याचं हे दुःख लवकरात लवकर संपवूया. गोव्यात एक नवी पहाट आणूया. मी वयाने म्हातारा असू शकतो, पण माझं रक्त तरुण आहे”, असं लुईझिन्हो फलेरो म्हणाले. “मी नवेलीम विधानसभेच्या लोकांचे माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आभार मानतो आणि भविष्यातील सर्व प्रयत्नांमध्ये त्यांच्या निरंतर समर्थनाची अपेक्षा करतो”, असं ट्विट माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो-फालेरो यांनी केलं आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.