माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन

वीरभद्र सिंह यांनी तब्बल सहा वेळा हिमाचलचे मुख्यमंत्रीपद भूषवले.

माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन

शिमलाः कॅंग्रेसचा दिग्ज नेता हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. शिमलाच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये वीरभद्र सिंह यांनी 87 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

वीरभद्र सिंह यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्रत्यांनी कोरोनावरही मात केली होती. रुग्णालयातून ते घरीही आले होते. मात्र, घरी आल्यावर त्यांची पुन्हा प्रकृती बिघडली. काही दिवसांपूर्वीच त्यांना अजुन रुग्णालयात भरती करण्यात आले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि राज्याचे सद्य मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनीही वीरभद्र सिंह यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती.गेल्या दोन दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, प्रकृती अधिकच खालावल्याने आज पहाटे त्यांनी अंतिम श्वास घेतला.

राजकीय कारकीर्द

87 वर्षीय वीरभद्र सिंह यांनी तब्बल सहा वेळा हिमाचलचे मुख्यमंत्रीपद भूषवले. तर तब्बल नऊ वेळा आमदार आणि पाच वेळा ते खासदार बनण्याचा अनोखा रेकॉर्ड त्यांनी कायम केला. यूपीए सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रीपद भूषविले होते. त्यांनी केंद्रात सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय सांभाळले होते. सध्या ते सोलान जिल्ह्यातील अर्की मतदारसंघाचे ते आमदार होते.

वीरभद्र सिंह यांनी याच वर्षी जानेवारी महिन्यात सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. पुढची निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते. यावेळी, 'मी निवडणूक लढणार नाही परंतु, मी काँग्रेसी होतो आणि मरेपर्यंत काँग्रेसीच राहीन' असे वक्तव्य वीरभद्र सिंह यांनी केले होते. काँग्रेसच्या भरभक्कम शिलेदारां पैंकी एक म्हणून वीरभद्र सिंह ओळखले जात होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.