माजी क्रिकेटर यशपाल शर्मा यांचं निधन

यशपाल शर्मा यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

माजी क्रिकेटर यशपाल शर्मा यांचं निधन

मुंबई : भारतीय संघाचा माजी क्रिकेटर यशपाल शर्मा यांचं आज निधनं झालं आहे. आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने यशपाल शर्मा यांचं निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. यशपाल शर्मा यांनी भारतासाठी एकूण ३७ टेस्ट मॅचेस खेळल्या होत्या. ज्यामध्ये त्यांनी ३४ च्या सरासरीने १६०६ रन्स बनवले होते. यासोबत त्यांनी एकूण ४२ वनडे मॅचेस खेळल्या होत्या. ज्यामध्ये त्या ८८३ रन्स केले होते.

१९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्यांनी ८९ धावांची खेळी केली होती. तर इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्यांनी ६१ धावांची खेळी केली होती.मात्र १९८३ च्या वर्ल्ड कपनंतर यशपाल शर्मा यांच्या करियरला चढता आलेख मिळताना दिसला नाही. खराब परफॉर्मन्समुळे यशपाल शर्मा यांना टेस्ट टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. शिवाय वनडेमध्ये देखील त्यांचा समावेश केला गेला नाही. यानंतर त्यांनी वनडेमध्येही पुनरागमन करण्यास अयशस्वी ठरले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.