माजी राष्ट्रपती डॉ.शंकर दयाल शर्मा यांच्या पत्नी विमला शर्मा यांच निधन.

1 min read

माजी राष्ट्रपती डॉ.शंकर दयाल शर्मा यांच्या पत्नी विमला शर्मा यांच निधन.

डॉ शंकर दयाल शर्मा हे भारताचे नववे राष्ट्रपती होते.

माजी माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ.शंकर दयाल शर्मा यांच्या पत्नी विमला शर्मा यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी विमला शर्मा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. राष्ट्रपतींनी ट्वीट करून, 'माजी राष्ट्रपती डॉ.शंकर दयाल शर्मा यांच्या पत्नी सौ.विमला शर्मा यांच्या निधनाबद्दल ऐकून वाईट वाटले. मी त्याच्या कुटुंबियांबद्दल आणि प्रियजनांबद्दल शोक व्यक्त करतो.
डॉ शंकर दयाल शर्मा हे भारताचे नववे राष्ट्रपती होते. आणि त्यांनी जुलै 1992 ते 1997 या काळात हे पद सांभाळले होते. राष्ट्रपती होण्यापूर्वी ते 3 सप्टेंबर 1987 ते 24 जुलै 1992 या कालावधीत भारताचे आठवे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे कार्यकारी अध्यक्ष होते.