माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन.

1 min read

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन.

प्रणब मुखर्जी यांनी सन 2012 ते 2017 या काळात भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून काम केले आहे.

नवी दिल्ली: माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी(84) यांच निधन झालं आहे. त्यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी ही माहिती दिली. काही दिवसांपासून ते आजारी होते, त्यांना कोरोनाची लागण ही झाली होती. त्यांच्यावर दिल्ली कॅन्टमधील लष्करी संशोधन व रेफरल रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांच्या फुफ्फुसातील संसर्गामुळे त्यांना सेप्टिक शॉक आला होता. त्यांच्या कोरोना अहवालही पॉझिटिव्ह होता. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. माजी राष्ट्रपती मुखर्जी यांच्या कुटुंबात दोन मुले आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे.
10 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्यानंतर त्यांचे ऑपरेशन झाले. रुग्णालयात दाखल होताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. प्रणब मुखर्जी यांनी सन 2012 ते 2017 या काळात भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून काम केले आहे.