नवी दिल्ली: देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी अजूनही कोमात आहेत. त्यांचे मेडिकल बुलेटिन रविवारी दिल्ली कॅन्टच्या आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलने प्रसिद्ध केले आहे. यानुसार, 'माजी राष्ट्रपतींवर फुफ्फुसांच्या संसर्गावर उपचार सुरू आहेत.ते कोमात आहेत. त्यांना व्हेंटिलेटर लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले आहे.
शनिवारी वैद्यकीय बुलेटिन जारी करण्यात आले होते, त्यामध्ये प्रणव मुखर्जी यांची काळजी घेतली जात आहे आणि त्यांच्या फुफ्फुसातील संसर्गावर उपचार केले जात आहेत.
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी कोमात प्रकृतीत सुधारणा नाही.
दिल्लीच्या आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Loading...