माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा नाही.

1 min read

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा नाही.

त्यांना व्हेंटिलेटर सपोर्ट वर ठेवण्यात आले आहे.

नवी दिल्ली: शनिवारी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या तब्येतीत बदल झालेला नाही. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्ट वर ठेवण्यात आले आहे.प्रणब मुखर्जी यांना 10 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली. त्यांची लष्कराच्या रिसर्च अँन्ड रेफरल (आर अँड आर) रुग्णालयात मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती.
दिल्ली छावनी मधील आर अँड आर हॉस्पिटलने माजी राष्ट्रपती मुखर्जी यांच्या वैद्यकीय प्रकृती विषयी माहिती दिली. आज सकाळी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या तब्येतीत कोणताही बदल झालेला नाही. ते सध्या व्हेंटिलेटर सपोर्ट वर आहेत. तज्ञांच्या पथकाद्वारे त्यांचे बारकाईने निरीक्षण केले जात आहे.
84 वर्षीय प्रणब मुखर्जी यांना 10 ऑगस्ट रोजी येथील सैन्य रिसर्च अँन्ड रेफरल रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.