लोणावळ्यात माजी शिवसेना शहरप्रमुख राहुल शेट्टी यांची हत्या

राहुल शेट्टी हे आज सकाळी त्यांच्या घराखाली असलेल्या येवले चहाच्या स्टॉलवर चहा पिताना अचानक त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

लोणावळ्यात माजी शिवसेना शहरप्रमुख राहुल शेट्टी यांची हत्या

पुणे- शिवसेनेचे माजी शहरप्रमुख आणि शिवसेना संस्थापक उमेशभाई शेट्टी यांचे पुत्र राहुल उमेश शेट्टी यांचा आज सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास निर्घृण खून करण्यात आला .त्यांच्या राहत्या घरासमोर जयचंद चौकातच ही धक्कादायक घटना घडली. राहुल शेट्टी हे आज सकाळी त्यांच्या घराखाली असलेल्या येवले चहाच्या स्टॉलवर चहा पिताना अचानक त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी त्यांच्यावर मारेकर्‍यांनी तीन गोळ्या घातल्या. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. त्यांच्या डोक्यात दोन व छातीत गोळी लागली असून, मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. हल्ला झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राहुल शेट्टी यांना तात्काळ उपचारासाठी लोणावळ्यातील परमार हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु तेथे त्यांचा मृत्यू झाला.
लोणावळ्यातील जयचंद चौकात ही घटना घडल्याने लोणावळा शहर संपूर्णपणे हादरले आहे. ३० ते ३५ वर्षांपूर्वी राहुल शेट्टी यांचे वडील उमेश शेट्टी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आज राहुल यांची निर्घृण हत्या झाली. राहुल यांच्या पश्चात शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौम्या शेट्टी, आई मुलगा व मुलगी असा परिवार आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, पोलीस त्या मार्गाने मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. राहुल यांना आपल्याला मारण्याची सुपारी दिल्याचे संकेत मिळाल्यावर राहुल शेट्टी यांनी यासंदर्भात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिली होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.