मालीमध्ये फ्रेंच सैनिकांनी 50 हून अधिक जिहादी अतिरेकांना ठार मारले.

1 min read

मालीमध्ये फ्रेंच सैनिकांनी 50 हून अधिक जिहादी अतिरेकांना ठार मारले.

मोटरसायकलवर मोठ्या संख्येने स्वार झालेले दहशतवादी ड्रोनच्या निदर्शनास आल्यानंतर कारवाई करण्यात आली.

माली:आफ्रीकन देश मालीमध्ये फ्रांन्सच्या सैन्याने 50 हून अधिक जिहादी अतिरेक्यांचा खात्मा केला. फ्रेंच सरकारने सोमवारी या घटनेची माहीती देताना सांगितले की,मोटरसायकलवर मोठ्या संख्येने स्वार झालेले दहशतवादी ड्रोनच्या निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. माली येथील बुर्कीना फासो,नायजर आणि नायजेरीया या सिमेजवळून मोटरसायकलवर जात असताना दिसून आले होते.
france-jet
फ्रांस सरकारने म्हटले आहे की अल कायद्याशी संबंधीत जिहादी अतिरेक्यांच्या हालचाली लक्ष्यात आल्यानंतर त्यांच्यावर हवाई हल्ले करण्यात आले आणि त्यांचा खात्मा करण्यात आला.