मैत्रीदिनाच्या निमित्ताने 51 झाडांची लागवड

1 min read

मैत्रीदिनाच्या निमित्ताने 51 झाडांची लागवड

सदभाव संस्था व जागृती कॉलनी चा पुढाकार

प्रद्युम्न गिरीकर/हिंगोली: शहरातील तिरुपती नगर व जागृती कॉलनी भागात असणाऱ्या मोकळ्या जागेत जागतिक मैत्रीदिनाच्या निमित्त सदभाव सेवाभावी संस्था व नगरातील नागरिकांच्या पुढाकारातून 51 झाडे लावण्यात आली.
हिंगोली शहरामध्ये सदभाव सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी वृक्ष लागवड अभियान राबविला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर यावर्षीदेखील शहरात झाडे लावण्यात येत आहेत. तिरुपती नगर व जागृती कॉलनी भागात असणाऱ्या हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये आज नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन खड्डे खोदून 51 झाडांची लागवड केली. शहरातील इतर भागांमध्ये देखील नागरिकांनी पुढाकार घेऊन वृक्ष लागवड करावी व वृक्षाचे संवर्धन करावे असे आवाहन सर्व सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार भरतीया यांनी केले आहे.